मुंबई:कर्नाटक निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना शरद पवारांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष कर्नाटक मध्ये सत्ता स्थापन करणार असे संकेत मिळत आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या अपयशावर पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील सत्ताधार्यांना लक्ष केले आहे.
वानखडे यांना फळ मिळाले: केंद्रीय एजन्सीकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली गेली. त्यांच्यवर अन्याय झाला कारण की, नवाब मलिक यांनी हे लोक काय करतात हे जनतेसमोर आणले होते. त्यावेळी याची नोंद केंद्रीय एजन्सीने घेतली नाही. उलट नवाब मलिक यांनाच तुरुंगात टाकले. तात्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आता सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ह्याचे फळ त्यांना मिळाले असून त्याप्रमाणे कारवाई होत असल्याचे शरदपवार यांनी म्हटले आहे.
फोडाफोडीचा राजकारण: कर्नाटक भाजपला ६५ ठिकाणी काँग्रेस १३३, भाजपपेक्षा काँग्रेस दुप्पट जागा आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही त्या राज्यांमध्ये भाजपकडून सत्ताधारी पक्षाला लक्ष करून आमदार फोडून सत्ता मिळवणे, त्याकरता सत्तेचा वापर केला जात असल्याचा पाहायला मिळत आहे. कर्नाटक मध्ये देखील तेच केले. महाराष्ट्रात देखील तेच पाहायला मिळाले. मध्य प्रदेश, गोवा अशा राज्यात आमदार फोडून सत्ता भाजपने मिळवली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र फोडाफोडी खोक्यात राजकारण आवडत नसल्याच स्पष्ट झाले आहे. कर्नाटक राज्य हे त्याचे उदाहरण म्हणता येईल.कर्नाटक राज्य हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. कर्नाटक राज्यामध्ये निवडणुका लागल्यानंतर ज्या पद्धतीने केंद्रातील भाजपाच्या मोठ्या नेत्यांसह, पंतप्रधान, गृहमंत्री यांनी मोठ्या सभा घेतल्या. मात्र त्याचा परिणाम मतदारांनी आपल्यावर होऊ दिला नाही. भारतीय जनता पक्षाला हरवायची भूमिका तिथल्या जनतेने घेतली. तिथल्या जनतेचे मी अभिनंदन करतो.