महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मातृशोकानंतर केवळ तीनच दिवसांत कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरले आरोग्यमंत्री - आरोग्य मंत्री बातमी

जुन्या रुढी परंपरा बदलत्या काळाशी सुसंग असाव्यात, असा प्रबोधनाचा संदेश कृतीतून देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मातृशोकानंतर 14 दिवसांचे सुतक न पाळता 3 दिवासांच्या दुखवट्यानंतर कर्तव्यावर हजर झाले आहेत.

health minister rajesh tope
health minister rajesh tope

By

Published : Aug 6, 2020, 3:44 PM IST

मुंबई - प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात, असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृशोकाचे दु: ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. बुधवारी (5 ऑगस्ट) मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरुवात केली. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिल्याचे सांगतानाच आता ह्याच आशीर्वादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शनिवारी (1 ऑगस्ट) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रविवारी (2 ऑगस्ट) जालना जिल्ह्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियमावलीचे (कमी उपस्थिती, सोशल डिस्टंसिंग) पालन करण्यात आले.

टोपे कुटुंबीयांचे जालन्यासह राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आहे तिथूनच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

मार्चच्या सुरुवातीला जेव्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली नेमक्या त्या कसोटीच्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल होत्या. कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या आरोग्यमंत्र्यांना आईच्या भेटीसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. तरीही ते वेळात वेळ काढून ते आईला भेटायला जायचे.

ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर 14 दिवसांचे सुतक पाळताना सदस्यांनी कामकाज न करता घरातच थांबण्याची प्रथा आहे. पूर्वी निरोप जायला वेळ लागायचा, दळणवळणाची साधने पुरेशी नसल्याने नातेवाईक यायलाही विलंब व्हायचा. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या काळाशी तर्कसंगत निर्णय घेताना बदलाची सुरुवात स्वत: पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर 14 दिवसांचा दुखवटा न पाळता याकाळातील विधी तीन दिवसात केले, असे टोपे यांनी सांगितले. जुन्या परंपरा ह्या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details