महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुसळधार पावसानंतर मुंबईची रस्तेवाहतूक सुरळीत - TRAFFIC MOVING.

दोन दिवस मुंबईसह राज्याला पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने मुंबईची वाताहत केली होती. परंतु सोमवारी पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबईची रस्तेवाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

मुसळधार पावसानंतर मुंबईची रस्तेवाहतूक सुरळीत

By

Published : Aug 5, 2019, 11:21 AM IST


मुंबई- दोन दिवस मुंबईसह राज्याला पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने मुंबईची वाताहत केली होती. परंतु सोमवारी पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबईची रस्तेवाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

मुसळधार पावसानंतर मुंबईची रस्तेवाहतूक सुरळीत

सकाळपासूनच अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु त्याचा सर्वसामान्य जनजीवनावर सध्यातरी त्याचा परिणाम झालेला नाही. रस्ते वाहतूकही नियमितप्रमाणे सुरू झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूकही सुरुळीत करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग सुद्धा रोज प्रमाणे धावत आहे. काही भागात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसानंतर चाकरमानी आपल्या रोजच्या कामासाठी निघालेला आहे. हवामान खात्याने राज्यात पावसानंतर इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details