मुंबई - शिवसेना पक्षाचा उद्या (शुक्रवारी) 54 वा वर्धापन दिवस आहे. पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच हा वर्धापनदिन डिजिटल स्वरूपात साजरा होणार आहे. आता फक्त शिवसेनेचीच नव्हे तर महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. यामुळे ते सोशल मीडियाद्वारे वर्धापनदिनी तमाम जनतेला मार्गदर्शन करतील. याचा आम्हा शिवसैनिकांना अभिमान आहे, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिवसेना पक्षाचा उद्या (शुक्रवारी) 54 वा वर्धापन दिवस आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे उद्याचा शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन शिवसैनिक एकत्र येऊन साजरा करणार नाही. तर पहिल्यांदाच शिवसेनेचा वर्धापन दिन डिजिटल स्वरूपात साजरा होणार आहे.