मुंबई -अंधेरी मरोळ येथील रोल्टा नेट कंपनीच्या सर्व्हर रूमला काल गुरुवारी सकाळी साडे अकाराच्या दरम्यान आग लागली. सदर इमारत काचेची असल्याने इमारतीमध्ये भीषण आग पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल 18 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसणे तसेच करण्यात आलेल्या बांधकामांच्या परवान्यांची पाहणी करुन कारवाईचे संकेत अग्निशमन दलाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा -
अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला पुन्हा लागली आग, जीवितहानी नाही
अंधेरी एमआयडीसी, रोड नंबर 22, तुंगा पॅराडाईझ येथे रोल्टा नेट कंपनीच्या सर्व्हर रूममध्ये आग लागली होती. आग लागलेली इमारत काचेची होती. त्यामधून आगीचा धूर बाहेर पडण्यास जागा नसल्याने क्षणार्धात आग इमारतीमध्ये पसरली. तिसरा आणि चौथ्या मजल्यावर आग पसरल्याने हे दोन्ही मजले आगीत जळून खाक झाले आहेत. त्यात इलेक्ट्रीक वायर, विद्यूत यंत्रसाम्रगी, संगणक, एसी शीट्स, फाईल, लाकडी वस्तू जळाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन केंद्राच्या 12 फायर इंजिन व 10 जम्बो वॉटर टँकरच्या साह्याने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.