मुंबई:राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंग्याच्या वादावर राज्य सरकारच्या वतीने आयोजित केलेली सर्व पक्षिय बैठक सुरु झाली आहे. भोंग्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एमआयएमचे इम्तीयाज जलील आदी प्रमुख नेत्यांनी बैठकीकडे पाठ फीरवली आहे.
Loudspeaker controversy: राज, फडणवीस, आंबेडकरांची पाठ तरी भोंग्या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला सुरुवात - MNS president Raj Thackeray
राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंग्याच्या वादावर (Loudspeaker controversy) राज्य सरकारच्या वतीने आयोजित केलेली सर्व पक्षिय बैठक सुरु झाली (meeting of all party leaders started) आहे. भोंग्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, (MNS president Raj Thackeray) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, (Leader of Opposition Devendra Fadnavis) बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी प्रमुख नेत्यांनी बैठकीकडे पाठ फीरवली आहे.
नेत्यांच्या बैठकीला सुरुवात
भोंग्याचा वाद सध्या राज्यभर चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होत आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वांवर या बैठकीत चर्चा होत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.