मुंबई- रिया चक्रवर्ती सोबत अमली पदार्थांबाबत झालेल्या चॅट प्रकरणी ईडीने गौरव आर्यला समन्स दिला होता. त्यानुसार गौरव आर्य आज सकाळी १०.३० वाजता ईडी कार्यालयात गेला होता. येथे अधिकाऱ्यांनी त्याच्याशी ९ तास चौकशी केल्यानंतर तो ईडी कार्यालयातून बाहेर निघाला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील अमली पदार्थांसंबंधात आज (३१ ऑगस्ट) ईडीने गोव्याचे उद्योजक गौरव आर्य यांची चौकशी केली. गौरव आर्यचे नाव रियाशी केलेल्या अमलीपदार्थसंबंधी व्हॉट्सअॅप चॅटवर आले होते. यामुळे ईडीने आर्य याची तब्बल ९ तास चौकशी केली.