महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर आरे कॉलनीतील नवसाचा पाडा उजाळला - मुंबई

मुंबईच्या आरे कॉलनीमधील रॉयलपाम सारख्या भागात विझेचा नेहमीच झगमगाट असतो, तर त्याच आरे कॉलनीच्या दुसऱ्या भागात काळोख होता. पिढ्यानपिढ्या येथील आदिवासी बांधव अंधारात जीवन जगत होते. वारंवार शासन दरबारी आवाज उठवल्यावर अखेर आरेमधील नवसाच्या पाड्याला वीज मिळाली.

वीजेच्या मीटरचे उद्घाटन करताना नागरिक

By

Published : Jul 1, 2019, 10:27 PM IST

मुंबई - विकासाचा गंधही न पोहोचलेल्या आरे कॉलनीतील आदिवासींच्या नवसाचा पाड्यामध्ये स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर वीज आली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी वीजेच्या मीटरचे उद्घाटन करीत जल्लोष केला.

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर आरे कॉलनीतील नवसाचा पाडा उजाळला

मुंबईच्या आरे कॉलनीमधील रॉयलपाम सारख्या भागात विझेचा नेहमीच झगमगाट असतो, तर त्याच आरे कॉलनीच्या दुसऱ्या भागात काळोख होता. पिढ्यानपिढ्या येथील आदिवासी बांधव अंधारात जीवन जगत होते. वारंवार शासन दरबारी आवाज उठवल्यावर अखेर आरेमधील नवसाच्या पाड्याला वीज मिळाली. वीज मीटर जोडणी आणि वायरींगचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले होते. आज खऱ्या अर्थाने नवसाचा पाडा हा विद्युत दिव्यांनी उजळून निघाला आहे.

जून महिन्यात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकाऱ्यांनी नवसाच्या पाड्याला विद्युत व जलजोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यावेळीही येथील आदिवासी बांधवांनी बँड वाजवून जल्लोष केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details