मुंबई- मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराईतील 'झामझड' या आदिवासी पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी वीज आली आहे. त्यामुळे हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे. या आदिवासी पाड्यातील ५४ घरांपैकी ४४ घरांत वीज पुरवठा करण्यात आला आहे. हा पाडा शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे.
मुंबईजवळच्या झामझड पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पोहोचली वीज - मुंबई
मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराईतील 'झामझड' या आदिवासी पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी वीज आली आहे.
घराघरांत वीज, तसेच रस्त्यावर विजेचे दिवे नसल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. त्याबरोबरच अंधारामुळे येथील विद्यार्थ्यांना दिवा बत्तीचा आधार घेऊन अभ्यास करावा लागत असे. अखेर ३ पिढ्यांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या या आदिवासी पाड्यात वीज पोहचल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अदानी ग्रुपने झामजड पाडा येथे विजेचे काम पूर्ण केले आहे. आपली घरे प्रकाशाने उजळलेली पाहताना या पाड्यातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.