महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO: महालक्ष्मी एक्सप्रेसला पाण्याने घेरले, पाहा हवाई दृश्य - महालक्ष्मी एक्स्प्रेस

एनडीआरएफ पथकाला मदत करण्यासाठी नौदल आणि वायुदलाचे हेलिकॉप्टरही मदत करत आहे.

वायुदलाचे हेलिकॉप्टर मदतीला

By

Published : Jul 27, 2019, 2:26 PM IST

Updated : Jul 27, 2019, 2:46 PM IST

मुंबई- मुसळधार पावसामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकून पडली आहे. या रेल्वेमध्ये 700 प्रवासी अडकले होते. त्यापैकी 700 जणांची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित 100 जणांचीही लवकरच सुटका केली जाईल, असे एनडीआरएफच्या बचाव पथकाने सांगितले.

वायुदलाचे हेलिकॉप्टर मदतीला

एनडीआरएफ पथकाला मदत करण्यासाठी नौदल आणि वायुदलाचे हेलिकॉप्टरही मदत करत आहे. रेल्वे भोवती मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून प्रवाशांना बाहेर निघता येत नाही. हेलिकॉप्टरमधून परिसरात पुर्णतहा पाणी साचल्याचे दिसत आहे. 8 बोटींद्वारे एनडीआरएफ पथक प्रवाशांना वाचवत आहे.

रेल्वेमधून बाहेर न पडण्याचे आवाहन मध्ये रेल्वेने केले आहे. रेल्वेमध्येच तुम्ही सुरक्षित आहात. रेल्वे पोलीस आणि एनडीआरएफच्या पुढील आदेशाची वाट पाहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Last Updated : Jul 27, 2019, 2:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details