मुंबई- उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणबाबत निर्णय दिला. या निर्णयावर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी न्यायाधीश रणजित मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर संविधान पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप लावला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस, तावडे यांच्यासह न्यायाधीश मोरे यांची सीबीआय चौकशी करा - अॅड सदावर्ते
उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणबाबत निर्णय दिला. या निर्णयावर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी न्यायाधीश रणजित मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर संविधान पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप लावला आहे.
न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे माध्यमांसमोर येऊन सांगतात की, निकाल त्यांच्या बाजूने येणार आहे. विनोद तावडे यांना न्यायालय काय निर्णय देणार आहे, हे कसे कळले याची चौकशी होणे गरजेचे आहे. या संदर्भात न्यायाधीश मोरे, मुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे यांचे फोन कॉल तपासले जावेत अशी मागणी अॅड सदावर्ते यांनी केली आहे. तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी दिलेल्या निर्णयाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी मिळून संविधान पायदळी तुडविल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. आज मराठा आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विरोधी याचिका व समर्थनातील याचिकांवर सुनावणी झाली. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण 12 ते 13 टक्के दिले जाऊ शकते, असे म्हणत गायकवाड समितीच्या अहवलानुसार मराठा समाज हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्याचे म्हटले आहे.