महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 3, 2019, 5:43 PM IST

Updated : Oct 3, 2019, 7:21 PM IST

ETV Bharat / state

ठाकरे कुटुंबाने मराठी माणसाला काय दिले - अॅड. सुरेश माने

मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, अशा सर्व मराठी माणसाला ठाकरे कुटुंबीयांनी काय दिले, असा प्रश्न वरळीतील आघाडीचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांनी उपस्थित केला आहे.

अॅड. सुरेश माने

मुंबई - मुंबईमध्ये गिरण्या बंद झाल्या, कारखाने बंद झाले, मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, अशा सर्व मराठी माणसाला ठाकरे कुटुंबीयांनी काय दिले हाच मुख्य प्रश्नच पडला आहे. याच प्रश्नाभोवती वरळी येथील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

अॅड. सुरेश माने यांच्याशी संवाद साधताना


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी स्वीकारली. त्यांना वरळी येथील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट देण्याचे तातडीने जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - यंदाही सुनिल राऊतच निवडून येणार - संजय राऊत


माने म्हणाले, सरकारकडून देण्यात आलेले दोन कोटी नोकऱ्या आणि विकासाचे जे आश्वासन होते त्याचं मुंबईत काय अस्तित्व आहे. आज मुंबईमध्ये गिरण्या बंद पडल्या, कारखाने बंद पडले. प्रचंड मोठ्या संख्येने मराठी माणूस देशोधडीला लागला याचे उत्तर हे ठाकरे परिवाराकडून काय मिळणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावरच आपण वरळी मतदार संघात निवडणूक लढवणार असल्याचे माने यांनी सांगितले.


ते म्हणाले, की वरळी या मतदारसंघातूनच माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा संपूर्ण मतदारसंघ माझा परिचित आहे. या मतदारसंघाचे सामाजिक समीकरण खूप चांगले आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार शोभेल असेच या मतदारसंघाचे वातावरण आहे. या मतदारसंघात मराठी माणसाची प्रचंड मोठी संख्या आहे. गिरणी कामगार आणि इतर कामगार असतील ही संख्या मोठी आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बबनदादा शिंदेसह पंकज भुजबळांना पुन्हा संधी


शिवसेनेचे मुंबई महापालिकेवर 25 वर्षे सत्ता आहे. तरीही मुंबईचा विकास किती झाला हे लोकांना ठाऊक आहे. त्यात वरळीचा किती विकास झाला हेही लोकांना ठाऊक आहे. साधा बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रश्न फडणवीस सरकारने मागील पाच वर्षात सोडवला नाही. कोस्टल रोडच्या माध्यमातून सर्व मच्छीमार बांधव उद्ध्वस्त केला जातोय. त्यामुळे हे कोणत्या विकासाच्या नावाने प्रक्रिया राबवत आहेत हा मोठा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.


राज्यात सेना-भाजप सरकार आहे. सर्वात मोठा कर्ज बाजारी शेतकरी आत्महत्याग्रस्त राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे. या सरकारकडे राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या विकासासाठी कोणताही विकासाचा मुद्दा नाही आणि तोच विषय मुंबईसाठी लागू आहे. जे मुंबई शहर देशाच्या एकूण उत्पन्नाच्या पंधरा टक्के उत्पन्न देते त्या मुंबईसाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने काय केले हा प्रश्न सध्या उपस्थित आहे. मुंबईकरांवरील कराचा बोजासुद्धा या सरकारने कमी केला नाही, अशा पद्धतीमध्ये मुंबईकरांसाठी सोयीसुविधा काय दिलेले आहेत असे, अनेक प्रश्न असल्याचे माने म्हणाले.


वरळीमध्ये सर्वात मोठा प्रश्न येथील धोबी घाटाचा आहे. वरळीतील मच्छीमारांच्या समस्या, महापालिका कर्मचाऱ्यांचा आणि बीडीडी चाळधारक आणि तेथील भाडेकरूंच्या मोठ्या समस्या आहेत. अशा अनेक प्रश्नांवर सरकारला यश आले नाही. म्हणून लोकांच्या रागाला सामोरे जावे लागेल. यासाठी वरळीमध्ये आघाडी पक्षाकडून निवडणूक जिंकू असा, मला विश्वास असल्याचे माने म्हणाले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणीने बांधले 'शिवबंधन'

Last Updated : Oct 3, 2019, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details