मुंबई -औरंगाबाद नामांतराचा मुद्दा सध्या तापलेला आहे. सर्व राजकीय पक्ष आपली वेगवेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही या विषयात उडी घेत पुणे जिल्ह्याच्या नामांतराची मागणी केली आहे. संभाजी महाराजांचे नाव पुण्याला द्यावे, अशी मागणी केली आहे.
औरंगाबादच्या नामांतरावरून सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. औरंगाबाद आणि संभाजी महाराज असा काही संबंध नाही. संभाजी महाराजांची समाधी पुण्यात आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर पुणे जिल्ह्याला द्यावे, अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सेना-भाजप सत्तेत असताना नामांतर का नाही..?
औरंगाबाद महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत म्हणून हा नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार होते तेव्हा नावात बदल का केला नाही?, असा प्रश्न ही त्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला केला आहे.
चंद्रकांत पाटील 'तेव्हा' झोपले होते का