मुंबई -माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशातील एक कणखर नेतृत्व होत्या. त्यांच्याबद्दल शिवसेनेला नितांत आदर असून कोणताही शिवसैनिक त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी इंदिरा गांधी या कुख्यात डॉन करीम लाला याला भेटल्याच्या वक्तव्यावरून वाद उफाळला आहे. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारले असता, त्यांनी इंदिराजींबद्दल शिवसेनेला नितांत आदर आहे. असे वक्तव्य केलं. मात्र, संजय राऊत यांचे ते विधान वैयक्तिक असून पत्रकार म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मंडल्याचे सांगत आदित्य ठाकरेंनी त्यांची पाठराखणही केली.