महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल - aditya thakre breaking news

सोशल मीडियावर जाहीर झालेल्या या मंत्री मंडळात चक्क पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, रोहित पवार, धंनजय मुंडे, छगन भुजबळ असे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षात समावेश करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे

By

Published : Oct 26, 2019, 11:41 PM IST

मुंबई- युवासेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद जाणार का ? याकडे शिवसैनिक व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. या बाबीवर अजून शिक्कामोर्तब व्हायचा आहे. मात्र, त्याआधीच आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचे मंत्रिमंडळ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षात समावेश करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे

सोशल मीडियावर जाहीर झालेल्या या मंत्रिमंडळात चक्क पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, रोहित पवार, धंनजय मुंडे, छगन भुजबळ असे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षात समावेश करण्यात आला आहे. आता याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरे यांचे सोशल मीडियावरील मंत्रिमंडळ चांगलेच ट्रोल झाले आहे. दिवाळीनंतर कुठले फटाके फूटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सेनेला बऱ्यापैकी यश मिळाले. त्यानंतर, महायुतीच्या सत्ता स्थापनेवेळी शिवसेनेकडे सत्तेत समान वाटा मागण्याची संधी चालून आलेली आहे. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. आता या प्रकरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे शिवसेनेकडून बोलले जात आहे.

हेही वाचा-निवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

ABOUT THE AUTHOR

...view details