मुंबई -आदित्य ठाकरे विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला. आजचा दिवस हा माझ्यासहित लाखो शिवसैनिकांसाठी आणि युवासेनेसाठी आनंदाचा क्षण आहे. गेले 53 वर्षे या दिवसाची वाट शिवसैनिक पाहत होते. आज ठाकरे घराण्यातील एका सदस्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आदित्य ठाकरे विक्रमी मतांनी निवडून येणार - वरुण सरदेसाई हे ही वाचा -आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत
काल आदित्य ठाकरे यांना एबी फॉर्म दिल्याचा पेपर चुकून फुटला गेला. मात्र, आज ते खर ठरल्याचा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. तर महिला आघाडीला प्रथम 'ती' च्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम आदित्य ठाकरेंनी केले आहे. महिलांसाठी आपण काय करु शकतो याची पंचसूत्री त्यांनी दिली. त्यामुळे आजचा क्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया महिला विकास आर्थिक महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी दिली.
हे ही वाचा -मनसेत भरती सुरू, विधानसभेसाठी लढवणार 150 जागा
दरम्यान, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आदित्यजींसारखा नेता महाराष्ट्राच्या विधीमंडळात असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळेल, असा विश्वास उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.