मुंबई- पहिल्यांदाच आमदारपदी विराजमान झालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आता महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी विराजमान होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
ठरलं..! आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ - महाविकास आघाडी मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल 1 महिन्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लाभला आहे. आज दुपारी 12 वाजता आमदारांना शपथ देण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे हे संसदीय राजकारणात उतरलेले ठाकरे कुटुंबाचे पहिलेच सदस्य आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत मातोश्रीवरूनच रिमोट कंट्रोल चालवून राजकारण केले. मात्र, प्रत्यक्षात ते कधी निवडणुकीत किंवा मंत्रिमंडळात सहभागी झाले नव्हते. परंतु, यावेळी ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी याबाबतीत नवा इतिहास घडवला आहे.