महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aditya Thackeray: मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावं; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज - एकनाथ शिंदे

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. टाटा-एअरबस प्रकल्पावरून (tata airbus project) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर टीका केली आहे.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

By

Published : Oct 31, 2022, 9:09 PM IST

मुंबई: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. टाटा-एअरबस प्रकल्पावरून (tata airbus project) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर टीका केली आहे. आदित्य म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या तुलनेत त्यांच्या महाविकास आघाडीने केंद्रासोबत उत्तम काम केले आहे. या सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील महाराष्ट्रात चुकीची माहिती पोहोचवत असल्याची टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज:यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "सध्या महाराष्ट्राच्या वाट्याचे जे काही बहुउद्देशीय प्रकल्प गुजरातला जात आहेत त्या सर्वांवर खरं तर उत्तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. स्क्रिप्ट वाचून दाखवली तरी चालेल. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन हजार कोटींचा इलेक्ट्रॉनिक हब उद्योग उभारला आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण दीड लाख कोटींपेक्षा मोठा प्रकल्प दोन हजार कोटींचा असतो हे मला माहीत नव्हतं. खरंतर या सर्व घडामोडींवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणे अपेक्षित होतं पण ते झालं नाही. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावं." असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.

त्यांना चुकीचे इनपुट दिले गेले असतील:आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, "उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नये. फॉक्सकॉनचा पहिला प्रकल्प वेगळा होता. सुभाष देसाई यांच्या वक्तव्याचा आधार देऊन जे काही आरोप केले जात आहेत तो फॉक्सकॉनचा प्रकल्प वेगळा होता. तो मोबाईल निर्मितीचा प्रकल्प होता. त्या प्रकल्पाच स्वरूप लहान होतं. आम्ही ज्या प्रकल्पाबाबत बोलतोय तो वेदांता फॉक्सकॉन असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे स्वरूप हे अतिशय मोठं होतं आणि हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीप बनवण्याचा होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला खोटी माहिती देऊ नये. कदाचित त्यांना त्यांच्या टीम कडून चुकीचे इनपुट दिले गेले असतील." असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

वेदांता फॉक्सकॉन टाईमलाईन:

५ जानेवारी २०२२ - वेदांताला केंद्र सरकारने अप्रुव्हल दिले.
१९ जानेवारी - सुभाष देसाईंचे अग्रवाल यांना पत्र .
२४ फेब्रुवारी - तळेगावला साईट विझिट
३ मे - फाॅक्सकाॅनची तळेगाव साईट विझिट
६ मे - सुभाष देसाई आणि वेदांताची बैठक
२४ मे - दाव्होसला अनिल अग्रवाल यांची भेट, महाराष्ट्रात येण्याची विनंती
२४ जून - फाॅक्सकाॅनच्या लोकांची दिल्लीत भेट
सरकार पडले.

सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे:आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, "टाटा एअर बस प्रकल्पात सरकारचे म्हणणे आहे की, टाटाच्या एका अधिकाऱ्या नुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील वातावरण चांगले नव्हते, त्यामुळे गुंतवणूक निघाली. तर फडणवीस यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव सांगा. केवळ उद्योगमंत्र्यांशीच नव्हे, तर नितीन गडकरीजींनीही या प्रकरणी पत्रव्यवहार केला आहे. सरकारनेही पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकार आपल्या उणिवा झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे." असं आदित्य ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांनी शब्द मागे घ्यावा:उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांचा अपमान केला. याशिवाय, नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेम्बडी पोरं म्हटलं, हे अत्यंत चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री यांनी शब्द मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details