मुंबई- राज्य सरकारने 10 रुपयात शिवभोजन सुरू केले आहे. सध्या या योजनेसाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जात आहे. पुढे हे अनुदान कमी करून सीएसआर आणि कॉर्पोरेट फंडचा वापर करून शिवभोजन देण्याचा विचार सुरू आहे. येत्या काळात भंगारात काढल्या जाणाऱ्या एसटी आणि बेस्टच्या बसमध्ये शिवभोजन उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
भूक लागलेल्या प्रत्येकासाठी 'शिवभोजन' - आदित्य ठाकरे
मुंबई महापालिकेच्या भायखळा राणीबाग येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्राणी पक्षांच्या पिंजऱ्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई महापालिकेच्या भायखळा राणीबाग येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्राणी पक्षांच्या पिंजऱ्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना आदित्य म्हणाले, माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे नेहमी पोटाला कधीच धर्म नसतो, असे सांगायचे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती किंवा जात-पात न बघता भूक लागलेल्या प्रत्येकाला त्याचे पोट भरता यावे, म्हणून 10 रुपयात शिवभोजन योजना सुरू केली आहे. आतापर्यंत 150 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जिथे शकय होईल, त्या ठिकाणी ही योजना सुरू केली जाणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.