मुंबई -शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे बुधवारी शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी भायखळा येथे येणार आहेत. या मतदार संघात यामिनी जाधव यांना निवडून आणण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
भायखळा मतदार संघ दरवेळी नवीन आमदार देणारा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. येथून काँग्रेसचे मधू चव्हाण आणि एमआयएमचे वारीस पठाण हे या ठिकाणी आमदार होते. यावेळी हे दोन्ही आजी-माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी आव्हान उभे केले आहे.