मुंबई Aditya Thackeray Criticizes State Govt :राज्यातील जनतेच्या पैशाची लूट करण्याचा डाव संविधानबाह्य सरकारने आखला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे मेट्रोच्या लाईन क्रमांक तीन, सहा, चार आणि 14 या चार लाईनसाठी एकत्र कारशेड डेपो तयार करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सुमारे सव्वा कोटी जनता एकाच कारशेड मधून कनेक्ट झाली असती आणि सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले असते. याशिवाय मुंबईतील आरेच्या जंगलाचा प्रश्न जो आता निर्माण झाला आहे तो झाला नसता. आमच्या सरकारने सुमारे 808 एकर जमीन ही वन म्हणून घोषित केली होती. आरेचे जंगल वाचावे हा आमचा त्यामागचा हेतू होता; मात्र या सरकारने केवळ अहंकारापोटी आणि केंद्र सरकारने केवळ महाराष्ट्राच्या द्वेषापोटी कांजूरची जागा आपली असल्याचा दावा करत या जागेवर कारशेड होऊ दिले नाही. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर पुन्हा कारशेड आरेला आणण्यात आले.
ठाण्यात शोधत आहेत जागा :सरकारने आता कांजुर मार्ग येथे मेट्रोच्या लाईन सहासाठी कारशेड उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजे आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य होता आणि ही जागा राज्य सरकारची आहे हे यांनी स्पष्ट केले. इतकेच काय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जुलै महिन्यात झालेल्या अधिवेशनात ही जागा राज्य सरकारची असल्याचे मान्य केले. म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या द्वेषापोटी केंद्र सरकारने अडवणूक केली होती हे स्पष्ट होते, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दहा हजार कोटींचे नुकसान :मेट्रोच्या दोन लाईनसाठी ठाणे येथे जागा शोधण्याचे काम सरकारने सुरू केले असल्याचे समजते. ठाणे जिल्ह्यामध्ये चार आणि 14 या लाईनसाठी जागा कोणाकडून घेण्यात येणार आहे? कोणत्या दराने घेणार आहे? आणि त्याचं कंत्राट कोणाला दिलं जाणार आहे? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या माध्यमातून चार लाईनसाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी डेपो करणे म्हणजे जनतेच्या पैशाची नासाडी आहे. प्रत्येक कार डेपोसाठी किमान अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला तरी दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. एकाच ठिकाणी कारशेड शक्य असताना चार वेगवेगळ्या ठिकाणी कारशेड करून कंत्राटदारांचं भलं करणं आणि त्यानंतर मेंटेनन्स देऊन कंत्राटदारांचं उखळ पांढरं करणं हा या सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला नोटीस :घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदाराला नोटीस दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. मुंबईत यावर्षीसुद्धा पाणी तुंबले आहे आणि घोळ झाला आहे. वास्तविक आमचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. अनेक बाबतीत मुंबई महानगरपालिकेत सध्या भ्रष्टाचार आणि मनमानी सुरू आहे. या विरोधात आम्ही सातत्याने लढा देणारच असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा:
- Nana Patole On Mungantiwar: बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला उत्तर देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांना उत्तर देण्यास नानांचा नकार
- Nashik Drug Case : ड्रग्सविरोधात मोर्चा मातोश्रीवर काढा; नितेश राणेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
- Sambhaji Raje On Prakash Ambedkar : औंरगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिलेली शिवप्रेमीला आवडणारं नाही; 'वंचित'शी युती होणं अशक्य, संभाजीराजे स्पष्टचं बोलले