मुंबई :सोमवार १७ जुलैपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त ठरणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागानंतर सत्ताधारी आमदारांची संख्या जरी वाढली असली तरीसुद्धा ज्या कारणाने वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे गट मविआ सत्तेतून बाहेर पडून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले होते. त्या शिंदे गटावर प्रहार करण्यासाठी आता उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सज्ज झाले आहेत.
काय आहे ट्विटमध्ये -आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर ट्विट केले आहे. अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झाले आहे. पाहिले २० नंतर ९ असा विस्तार झाला आहे. आता या सगळ्यानंतर ओरिजनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपने ३३ देशांना दाखवून दिलंय!अभिनंदन! अशा पद्धतीचे खोचक ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर निशाणा साधला आहे. अशा वातावरणात होणारे पावसाळी अधिवेशन हे खळबळजनक ठरणार यात शंका नसल्याचेही ते म्हणाले.
धुणीभांडी करावी लागतील -महाविकास आघाडीचे सरकार असताना वित्तमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत. त्यांनी शिवसेना संपवायला घेतली आहे, असा थेट आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता व ते सत्तेतून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जात राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. आता शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर अजित पवार राष्ट्रवादीत बंडखोरी करत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागाने भाजप आमदारांसोबत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या कारणाने आपण सत्तेतून बाहेर पडलो त्याच अजित पवारांना आता पुन्हा सत्तेत घेतले गेले. पवारांना वित्त खाते दिल्याने आता उबाठा आमदारांकडून होणाऱ्या आरोपांना काय उत्तर द्यायचं? असा प्रश्न या आमदारांना पडला आहे. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवारांची धुणीभांडी करावी लागतील, असे वक्तव्य शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
हेही वाचा:
- CM Eknath Shinde : 'फडणवीस राजकारणातील निष्कलंक माणूस; सकाळचा नऊचा भोंगा बंद करा'
- Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवार श्रद्धास्थान, प्रेरणास्थान; त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात - अजित पवार
- Shasan Aapya Dari : पालकमंत्र्यांची आमदारांना साद शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 20 लाख देण्याची विनंती