महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही जगायचे कसे ? 'आदित्य संवाद'मध्ये अपंग मुलाचा आदित्यला सवाल - मुंबई

एका अपंग मुलाने मला रोजगार नाही, त्यामुळे आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

आम्ही जगायचे कसे ? 'आदित्य संवाद'मध्ये अपंग मुलाचा आदित्यला सवाल

By

Published : Apr 22, 2019, 11:33 PM IST

मुंबई- 'आदित्य संवाद' या कार्यक्रमांतर्गत आदित्य ठाकरे यांनी १८ ते ३५ वयोगटातील तरुणांशी संवाद साधला. यावेळी फक्त नावनोंदणी केलेल्याच तरुणांनाच प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. येथे एका अपंग मुलाने मला रोजगार नाही, त्यामुळे आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

आम्ही जगायचे कसे ? 'आदित्य संवाद'मध्ये अपंग मुलाचा आदित्यला सवाल

तरुणांना भेडसावणाऱया समस्या, त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरातील तरुणांशी संवाद 'आदित्य संवाद' या कार्यक्रमाद्वारे संवाद साधत आहेत. त्यानुसार त्यांनी नांदेड, कोल्हापूर व इतर ठिकाणी तरुणांशी संवाद साधला. आज (सोमवारी) मुंबईत 'आदित्य संवाद'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल वैद्य यांनी आपली कला सादर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details