महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खोके सरकारला अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी काही नाही - उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: तुम्ही कधीही हक्काने हाक मारा, तुमचा हा भाऊ सदैव तुमच्यासोबत असेल. (Anganwadi workers) सरकारजवळ थोडीतरी संवेदनशीलता असेल तर हे सरकार पडायच्या आत तुमची दखल घेईल, नाहीतर आपले सरकार तुम्ही आणणारच आहात. (Anganwadi workers movement) तेव्हा तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांना उद्देशून म्हणाले.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 6:05 PM IST

उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांना उद्देशून बोलताना

मुंबईUddhav Thackeray:आज मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. (Mumbai Azad Ground) आज क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आयुष्याचा पहिला श्रीगणेशा अंगणवाडीतून होतो. हल्ली क्रांतीसूर्य असे लोक राहिले नाहीत. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात. तुमचा हातात खूप ताकद आहे. तुम्ही देशाची सेवा करता; पण तुमच्यावर अन्याय होत आहे. आज मी नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून आलोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Savitribai Phule)


जाहिरातीवर पैसे उधळायला आहे, मात्र :मला जेव्हा विचारले की, तुम्ही आंदोलनस्थळी या तेव्हा मी काय म्हणून येऊ असा मला प्रश्न पडला होता. आता माझा अंगणवाडी सेविका आंदोलनाला पाठिंबा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणााले. असंख्य ज्योती एकत्र आल्यानं मशाल बनते. गद्दारी करून आमचे सरकार पाडले. आपलं सरकार असतं तर आंदोलन करण्याची तुमच्यावर वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, या सरकारला जाहिरातींवर उधळायला पैसे आहेत; पण तुम्हाला द्यायला पैसे नाहीत का? अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.


मग तुम्ही 'लाडली बेहेणा' नाही आहात का?मध्य प्रदेशमध्ये 'लाडली बेहेणा' ही योजना महिलांसाठी राबविली. त्यामुळं तिथं भाजपाचे सरकार आले असं बोललं जातंय. मग येथे आलेल्या माझ्या या बेहेणा आहेत की नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. कोरोनामध्ये माझं नाव जरूर झालं; मात्र घरोघरी जाऊन लोकांची तुम्ही काळजी घेतली. मंत्री सुदृढ आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आता आहे. मला काही यामध्ये राजकारण आणायचं नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा नको तर मदत हवी आहे. मतदारांबरोबर सेल्फी काढले मात्र मतदार जर उपाशी राहिले तर त्या सेल्फीचा उपयोग काय?, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला.


तुमच्या हक्काचे मिळालेच पाहिजे:पुढे बोलताना उद्धव ठाकरे बोलले की, मी राम लल्लाचं दर्शन घेणार आहे. मला निमंत्रणाची गरज नाही. तुम्ही इतरांना पोषित करता; मात्र स्वत: तुम्ही कुपोषित आहात. निमूटपणाने काम करणं सोडून द्या. अंगणवाडी सेविका रामभक्त नाही का? तुमच्या हक्काचे आहे ते मिळालेच पाहिजे. मी आणि माझे सर्व सहकारी तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्यामध्ये आम्ही फूट पडू देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा:

  1. हो मला 'वेड'च लागलंय, ते शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही; छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर
  2. सना खान हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे; मोबाईल, लॅपटॉप जप्त
  3. जामिनासाठी नवाब मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात जावं - मुंबई उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details