महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीन शैक्षणिक धोरणासाठी राज्याच्या कृती आराखड्याचे राज्यपालांपुढे सादरीकरण - शैक्षणिक कृती आराखड्याचे सादरीकरण

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन ही माहिती दिली. राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल उच्च शिक्षण विभागाकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती त्यांनी दिली. यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षणे नोंदवीत उपयुक्त सूचना केल्या.

presentation on New Education Policy
नवीन शैक्षणिक धोरणासाठी राज्याच्या कृती आराखड्याचे राज्यपालांपुढे सादरीकरण

By

Published : Aug 28, 2020, 6:41 AM IST

मुंबई- सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्चशिक्षण विभागाने कृतीआराखडा तयार केला आहे. या कृतीआराखड्याचे सादरीकरण गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर राजभवन येथे करण्यात आले. तसेच या शैक्षणिक धोरणातील तरतुदींबाबत उच्च शिक्षण विभागाकडून कोणकोणत्या प्रकारे अंमलबजावणी करता येईल यासाठीची माहितीही यावेळी देण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन ही माहिती दिली. राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल उच्च शिक्षण विभागाकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती त्यांनी दिली. यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षणे नोंदवीत उपयुक्त सूचना केल्या.

शिक्षणातील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, सन २०२५ पर्यंत उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण ५० टक्के इतके वाढविणे, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, मातृभाषेतून शिक्षणाला चालना देणे, डिजिटल ग्रंथालये, व्यवसायिक शिक्षणावर भर, या तसेच धोरणातील इतर तरतुदींसंदर्भात राज्यपालांना विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आणि मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details