मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकट्याकडे जवळपास 12 खाते आहेत, तर तिथेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जवळपास नऊ खाते आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवडे चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संबंधित खात्याबाबत विरोधकांना सविस्तर उत्तर देता यावे, यासाठी अतिरिक्त खात्यांचा भार इतर मंत्र्यांकडे वळवण्यात आला आहे. यामध्ये शिंदे गटातील मंत्री उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, या मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांजवळ असलेल्या खात्यांचा अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.
अतिरिक्त खाती देण्यात आलेले मंत्री :तानाजी सावंत यांच्याकडे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते वळवण्यात आले. गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता खाते वळवण्यात आले. शंभूराज देसाई यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, राज्य उत्पादन शुल्क खाते वळवण्यात आले. अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्यांक विकास, कृषी खाते वळवण्यात आले. उदय सामंत यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान, नगरविकास, उद्योग खाते वळवण्यात आले आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, राज्य उत्पादन शुल्क खाते वळवण्यात आले. दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल, शालेय शिक्षण व मराठी भाषा खाते वळवण्यात आले. दादा भुसे यांच्याकडे मृदू व जनसंधारण, बंदरे आणि खानिकर्म खाते वळवण्यात आले. संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, अन्न व औषध प्रशासन खाते वळवण्यात आले.