महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांच्या हाती, अदानी उद्योगाची सर्वाधिक 5,000 कोटी रुपयांची बोली - धारावी पुनर्विकास प्रकल्प

धारावी पुनर्विकासाबाबत 2004 आणि 2009 तसेच 2011 या कालावधीत तीन वेळा निविदा बोली लावण्यात आली होती. मात्र त्याला कोणत्याही मोठ्या उद्योग समूहाने प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर 2016 या वर्षी कोणत्याही उद्योग ( Dharavi project tender ) समूहांना निविदा करिता प्रतिसाद मिळाला नव्हता. 2018 मध्ये जागतिक पातळीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी पुन्हा निविदा मागवण्यात आल्या होत्या.

अदानी धारावी पुनर्विकास प्रकल्प
अदानी धारावी पुनर्विकास प्रकल्प

By

Published : Nov 30, 2022, 6:16 AM IST

Updated : Nov 30, 2022, 6:24 AM IST

मुंबई :557 एकर क्षेत्रफळात वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास भारतातील मोठे उद्योग समूह अदानी समुहाकडून ( Adani Group ) करण्यात येणार आहे. अदानी समुहाने पाच हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली ( Adani group wins Bid of Dharavi Redevelopment ) लावली. बोलीमध्ये तीन कंपन्या होत्या. सर्वाधिक किंमत अदानी समूहाने दिली. त्यामुळे निविदा त्यांना मिळणार ( Dharavi Redevelopment Project news ) हे नक्की झाले.


धारावी पुनर्विकासाबाबत 2004 आणि 2009 तसेच 2011 या कालावधीत तीन वेळा निविदा बोली लावण्यात आली होती. मात्र त्याला कोणत्याही मोठ्या उद्योग समूहाने प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर 2016 या वर्षी कोणत्याही उद्योग ( Dharavi project tender ) समूहांना निविदा करिता प्रतिसाद मिळाला नव्हता. 2018 मध्ये जागतिक पातळीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी पुन्हा निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याकरिता दुबई येथील सेकिलिंक कंपनीने सर्वाधिक बोली लावली. मात्र त्या वेळच्या तत्कालीन शासनाने महाधिवक्ताच्या शिफारसनुसार बोली ऑक्टोबर 2020 कालावधीत रद्द केली. या बोलीमध्ये सर्वाधिक किंमत दुबईच्याच कंपनीने लावलेली होती. तर अदानी उद्योग समूहाने कमी किंमत लावली होती.

बोलीमध्ये तीन कंपन्यांनी घेतला भाग :याबाबत सदर प्रकरणात सुरुवाती पासून लढा देणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू कोरडे यांनी सांगितले, सरते शेवटी पुन्हा बोली लावण्यात आली आणि तीनच कंपन्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. अदानी समूह, नमन उद्योग समूह आणि डीएलएफ उद्योग समूह यापैकी सर्वाधिक किंमत आदानी उद्योग समूहाने बोलीसाठी लावली. अदानी उद्योग समूहाने 5,000 कोटी रुपये इतपर्यंत किंमत अदा करण्याची तयारी ठेवली. तर नमन उद्योग समूहाने 1700 कोटी रुपयांची बोली लावली. डीएलएफ उद्योग समूहाने 2025 कोटी रुपयांची बोली लावली.

सेकिलिंक कंपनीला नियमानुसार निविदा द्यायला हवीवास्तविक सेकिलिंक कंपनीची आदी जेव्हा बोली लावली तेव्हा त्यांनी सर्वाधिक किंमत दिली होती. त्यांना नियमानुसार ही निविदा द्यायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. धारावीच्या पुनर्विकासासाठी दुसरी कंपनी नमन समुहाची निविदा अपात्र ठरली. कारण निविदा प्रक्रियेत डीएलएफ समुहाने २०२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे आता धारावी पुनर्विकास प्रकल्प सर्वाधिक बोली लावणाऱ्या अदानी समुहाला मिळणार यावर शिक्कामार्तब झाले.

Last Updated : Nov 30, 2022, 6:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details