मुंबई -पश्चिम ऑस्ट्रेलिया हे पृथ्वीवरील सर्वांत सुंदर स्थळांपैकी एक आहे. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ ते माझे घर आहे, हे मी माझे सुदैव समजतो, अशा भावना प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियातील पर्यटन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी गिलख्रिस्ट 6 नोव्हेंबरला मुंबईत आला होता. त्यावेळी त्याने माध्यमांशी संवाद साधला.
पश्चिम ऑस्ट्रेलिया पृथ्वीवरील सर्वांत सुंदर स्थळांपैकी एक - अॅडम गिलख्रिस्ट - Adam Gilchrist
भारतात पश्चिम ऑस्ट्रेलियाबद्दल माहितीचा प्रसार करण्यासाठी टुरिझम डब्ल्यूएसोबत काम करायला मिळाल्याबद्दल आनंद आहे. आमचे राज्य येऊन पाहाच, असे आवाहन अॅडम गिलख्रिस्टने यावेळी केले.
भारतात पश्चिम ऑस्ट्रेलियाबद्दल माहितीचा प्रसार करण्यासाठी टुरिझम डब्ल्यूएसोबत काम करायला मिळाल्याबद्दल आनंद आहे. आमचे राज्य येऊन पाहाच, असे आवाहन त्याने यावेळी केले.
भारतीय पर्यटकांमध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियाबाबत गोडी निर्माण व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये गिलख्रिस्टचा समावेश आहे.
अॅडम गिलख्रिस्ट पश्चिम ऑस्ट्रेलियन सरकारचे प्रीमियर मार्क मॅकगोवान यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियातील या सर्वांत मोठ्या राज्यात पर्यटन वाढावे, असा उद्देश या भेटीमागे आहे. ऑस्ट्रेलिया प्रमोट करण्यासाठी मॅकगोवान सरकार १ दशलक्ष डॉलर्स गुंतवणार आहे.