मुंबई : चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी ( Demand action against Urfi ) केली. सध्या त्या दोघींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार भांडण पाहायला मिळते. आता उर्फीने नवे ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. उर्फीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रा वाघ यांच्यासोबत मैत्री करण्यासाठी उत्सूक आहे.
उर्फीने केले असे ट्वीट : भाजप पक्षात प्रवेश घेण्यापुर्वी चित्राजी तुम्हाला संजय राठोड आठवतो का? भाजपात प्रवेश केल्यानंतर तर तुमची खुप जवळची मैत्री झाली होती. तुम्ही तर त्याच्या सर्व चुका विसरुन गेल्यात ज्यासाठी एनसीपीमध्ये गोंधळ घातला होता. असे ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून उर्फीला असे म्हणायचे होते की संजय राठोड हे मविआचा भाग होते. तेव्हा चित्रा वाघ त्यांच्या विरोधात बोलत होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करत होत्या.
संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट :संजय राठोड ( Sanjay Rathod ) शिवसेनेच्या शिंदे गटात सामिल झाले असून भाजपाच्यासोबत मंत्रीही झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे. तर चित्रा वाघ यांनी पुन्हा संजय राठोड यांच्या विरोधात काहीही कारवाई करण्याची मागणी का केली नाही ? असा सवाल उपस्थीत केला आहे. काय आहे नेमके प्रकरण?पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठेड यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्या सतत टीका करत राहिल्या होत्या. संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्या सतत टीका करत राहिल्या होत्या. संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे.