महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Actress Sulochna Latkar Funeral: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार - जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दादर प्रभादेवी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Actress Sulochna Latkar Funeral
अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

By

Published : Jun 5, 2023, 9:35 AM IST

Updated : Jun 5, 2023, 12:17 PM IST

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन

मुंबई :हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आई या भूमिकेला वात्सल्य रूप देणाऱ्या सुलोचना लाटकर यांचे रविवारी संध्याकाळी मुंबईत निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 94 होते. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली आहे. अशा प्रकारचे ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.



400 पेक्षा अनेक चित्रपटांत काम : सुलोचना लाटकर यांची फिल्मी कारकीर्द ही तब्बल सत्तर वर्षांची होती. त्यादरम्यान त्यांनी अनेक नामवंत अभिनेत्यांबरोबर बहिण, वहिनी आणि आई अशा भूमिका साकारल्या आहेत. सुलोचना दीदी यांनी सादर केलेल्या आईची भूमिका वात्सल्यरुपी म्हणून आज देखील अबाधित राहिली आहे. भालजी पेंढारकरांना गुरु मानणाऱ्या सुलोचना दिदी यांनी मराठी आणि हिंदी भाषेत 400 पेक्षा अनेक चित्रपट केले आहेत. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया चित्रपट आणि राजकीय सृष्टीतुन उमटत आहेत.




ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. सुमारे सहा दशके सुलोचना दीदींनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या निधनाने सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली आहे. पद्मश्री स्वर्गीय सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार


अजित पवार यांचे ट्विट : रुपेरी पडद्यावरच्या सहज सुंदर अभिनयाने सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचे ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे. सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका चरित्र अभिनयाचा आदर्श आहेत. 'मराठा तितुका मेळवावा' चित्रपटातल्या अभिनयाने त्यांनी जिजाऊ माँसाहेबांचे जिवंत दर्शन घडवले. त्यांची ती भूमिका केवळ अविस्मरणीय आहे. अमिताभ, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशीकपूर या अभिनेत्यांच्या यशस्वी कारकिर्दीत, त्यांच्या 'आई'ची भूमिका साकारणाऱ्या सुलोचना दीदींचे मोलाचे योगदान आहे. चेहऱ्यावरचा सोज्वळपणा, वागण्यातला सुसंस्कृतपणा, मनातला आत्मविश्वास, कुठलीही भूमिका सहजपणे साकारण्याची क्षमता अशा गुणांमुळे सुलोचना दीदींकडे अभिनयाचे विद्यापीठ म्हणून बघावे लागेल. त्यांना महाराष्ट्रभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित केल्यामुळे एका अर्थाने या पुरस्कारांचा गौरव वाढण्यास मदत झाली. सुलोचना दीदींनी गेली आठ दशके मराठी, हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात आणि कुटुंबातही स्थान मिळवले होते. त्यांचे निधन हा आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, असे अजित पवार यांनी ट्विट केले.


हेही वाचा :

  1. Actress Sulochna Latkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन; आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  2. Odisha train accident : सेलिब्रिटींनी ओडिशा ट्रेन अपघातावर व्यक्त केला शोक
  3. SRK and Salmans video viral : सलमान खान आणि शाहरुख खानचा लीक झालेला व्हिडिओ व्हायरल, क्लिप टायगर ३ असल्याचा चाहत्यांचा अंदाज
Last Updated : Jun 5, 2023, 12:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details