मुंबई :अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्री राखी सावंतच्या मेहंदीने तिच्या लग्नाचा रंग उडालेला नाही, तोवरच राखीने तिचा पती आदिल खान दुर्रानी विरुद्ध अंधेरीतील ओशवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राखी सावंतने आदिलवर मारहाण तसेच दागिने हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. ओशिवरा पोलिसांनी आज आदिलला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आज दुपारी राखी सावंत देखील ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली.
राखी सावंतचा आदिलवर आरोप : राखी सावंतने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले की, राखी सावंत आणि आदिल दुर्राणई जानेवारी 2022 मध्ये संपर्कात आले आणि दोघांनी संयुक्त व्यवसाय खाते उघडले. राखी सावंतच्या हिच्या नकळत दुर्राणीने जूनमध्ये कार खरेदी करण्यासाठी त्या खात्यातून 1.5 कोटींहून अधिक रक्कम काढली. परंतु त्याने तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितल्याने त्यावेळी तिने आक्षेप घेतला नाही, असे सावंत यांनी पोलिसांना तक्रारीत सांगितले.
दागिने चोरल्याचा आरोप : राखी सावंतने तक्रारीत आरोप केला आहे की, दुर्राणीने तिला एकापेक्षा जास्त वेळा धमकी दिली की मी तिच्यावर अॅसिड फेकणार आहे. समोरासमोर किंवा रस्ता अपघातात तिला ठार करणार आहे. दुर्राणी यांनी तिला नमाज अदा करण्यास भाग पाडल्याचा आरोपही सावंतने केला आहे. रविवारी (5 फेब्रुवारी) रात्री सावंतला त्यांच्या कपाटातून ५ लाख रुपये रोख आणि आईचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला तिच्या अंधेरी इमारतीच्या वॉचमनकडून कळले की, दुर्रानी तिच्या अनुपस्थितीत फ्लॅटला भेट दिली होती.