माजी पोलीस अधिकारी, धनराज वंजारी मुंबई : माजी आयकर अधिकारी तानाजी अधिकारी आणि त्याच्या दोन मित्रांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारत मनी लॉन्ड्रिंग केल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले. ईडीने या प्रकरणात त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. ईडीने या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे.
मित्राच्या कंपनीत वळवले पैसे :अटक करण्यात आलेला तानाजी अधिकारी हा मुंबईत आयकर विभागात निरीक्षक पदावर काम करत होता. त्यावेळी रिफंड क्लेम जारी करण्याचे काम त्याच्याकडे होते. त्यासाठी त्याच्या वरिष्ठांच्या संगणकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील त्याच्याकडे होता. त्यामुळे तो सोयीस्करपणे त्याद्वारे रिफंड जारी करत होता. तानाजी अधिकारी याने विविध क्लेम जारी करत क्लेम केलेले पैसे त्याचा मित्र भूषण पाटील आणि राजेश शेट्टी यांच्या कंपनीत जमा केले. वर्ष 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत रिफंडच्या एकूण 12 प्रकरणाद्वारे त्याने तब्बल 263 कोटी रुपये या कंपनीमध्ये वळवले.
ईडीकडून अटक :सरकारी तिजोरीतून एकाच बँक खात्यात एवढी मोठी रक्कम आल्याचे संबंधित बँकेच्या निदर्शनास आले. बँकेच्या त्या खात्यासंदर्भात पडताळणी सुरू करत त्याची माहिती आयकर विभागाला दिली. याप्रकरणी आयकर विभागाच्या आयुक्तांनी सर्वात आधी या प्रकरणी सीबीआयमध्ये तक्रार दाखल केली. मात्र मनी लाँड्रिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ईडीने याचा तपास आपल्या हाती घेतला आणि तपासाची चक्रे जोरदार फिरवली. ईडीने जानेवारीपासून आतापर्यंत तानाजी अधिकारी राजेश शेट्टी आणि भूषण पाटील या तिघांचे कर्जत, खंडाळा, लोणावळा, पुणे, उडपी येथील भूखंड आणि पनवेल आणि मुंबई येथील फ्लॅट्स त्याचप्रमाणे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि ऑडी अशा 3 आलिशान गाड्या देखील जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 30 कोटी रुपये असून याशिवाय बँक खात्यातील रक्कम अशी 116 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्ती करण्यात आली आहे.
कोण आहे कीर्ती वर्मा : अभिनेत्री कीर्ती वर्मा हिचा देखील या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे. कीर्ती आधी जीएसटी विभागात अधिकारी म्हणून काम करत होती. दरम्यान या प्रकरणात आयकर अधिकाऱ्याचा मित्र असलेला भूषण पाटील याची कीर्ती वर्मा ही मैत्रीण आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून कीर्तीने गुरुग्राम येथे एक मालमत्ता 1 कोटी 2 लाख रुपयांना खरेदी केली. एका वर्षातच तिने ही मालमत्ता 1 कोटी 18 लाख रुपयांना विकली. हे खरेदी विक्रीचे व्यवहार देखील ईडीच्या रडारवर आल्यानंतर तिच्या बँक खात्यातील ही रक्कम ईडीने आता जप्त केली आहे.
हेही वाचा -
- Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तोयबापर्यंत! मास्टमाईंडला अटक करण्याकरिता पोलीस बेळगावला रवाना
- 200 crore scam: आदर्श नागरिक सहकारी बँकेत दोनशे कोटींचा घोटाळा, संचालक मंडळावर गुन्हा दाखल