मुंबई - राज्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागत असतानाच त्यात आता अभिनेत्री दीपाली सय्यद यांची भर पडली आहे. अभिनेत्री सय्यद यांनी गुरूवारी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्या मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवणार आहेत.
अभिनेत्री दीपाली सय्यद 'शिव'बंधनात, मुंब्रा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात - Actress dipali sayyad joined shivsena
गुरूवारी दीपाली यांनी रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आणि शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्या मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवणार आहेत. याबरोबरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना सेनेकडून हिरवा कंदील दाखवला आहे.
हेही वाचा -भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही
गुरूवारी दीपाली यांनी रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आणि शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्या मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवणार आहेत. याबरोबरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना सेनेकडून हिरवा कंदील दाखवला आहे. आज (शुक्रवारी) त्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.