मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पती रणवीरसह गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. दीपिकाला आज (शुक्रवारी) १०.३० वाजता एनसीबी समोर चौकशीसाठी हजर राहायचे आहे. आधी दीपिकाने मुंबईत परतण्याचा आपला प्लॅन काहीसा लांबणीवर टाकला होता. खरं तर, खासगी विमानाने ती गुरुवारी दुपारीच गोव्याहून मुंबईत परतणार होती. मात्र, माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ती गुरुवारी रात्री ऑर्बिट एव्हिएशनच्या चार्टर्ड प्लेनने पती रणवीरसिंहसह गोव्याहून मुंबईत दाखल झाली.
६ महिने लॉकडाऊन पाळल्यानंतर नुकतेच दीपिकाने पुन्हा कामाला सुरुवात केली होती. ती दिग्दर्शक शकून बत्रा यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाली होती. मात्र, नेमके त्याचवेळी जया साहा हिच्या मोबाईलमध्ये एक नंबर सापडला. हा नंबर 'डी' या नावाने सेव्ह होता. या नंबरची शहानिशा एनसीबीने केली असता, तो नंबर दीपिकाच्या मॅनेजरचा असल्याचे उघड झाले. त्या नंबरवरील व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्याने दीपिका अडचणीत सापडली आहे. यात तिने 'माल है क्या?' अशी विचारणा केल्याचे एनसीबी तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, दीपिका ही नक्की ड्रग्ज घेते अथवा नाही, आणि जया सहा हिच्याशी तिचा नक्की काय संबंध आहे, याचा तपास करण्यासाठी एनसीबीने तिला उद्या (२५ सप्टेंबर) हजर राहण्याबाबत समन्स बजावला आहे.
असा झाला दीपिकाचा प्लॅन बदलल्याचा उलगडा