मुंबई:अमिषा पटेलबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. अमिषा पटेल विरोधात झारंखडमधील रांची न्यायालयात वॉरंट जारी केले होते. या वॉरंटला आव्हान देण्यासाठी अमिषा पटेलने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काय आहे प्रकरण?:अमिषा पटेलने हिने धनादेश देताना तो वटला नाही. यामुळे तिच्याविरुद्ध रांची येथे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर रांची न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. रांची न्यायालयाने त्यासंदर्भात अमिषा पटेल हिच्याविरुद्ध अटक वॉरंट देखील जारी केले होते. मात्र अमिषा पटेल हिचा असा दावा होता की, कोणत्याही सुनावणी शिवाय तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे तिची बाजू एकून घ्यावी, अशी विनंती तिने आपल्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यामुळे न्यायालयाने तिची बाजू आणि तक्रारदाराची बाजू देखील ऐकून घेतली.
मुंबई उच्च न्यायलयात धाव: अभिनेत्री अमिषा पटेल हिने आपल्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंट संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू ऐकून घेण्यासंदर्भात तातडीने याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने तिची बाजू वकिलांच्याकडून ऐकून घेतली. तिच्या या प्रकरणाची सुनावणी २८ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
अमिषा पटेल विरोधात अटक वॉरंट: फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरुद्ध वॉरंट रांची न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. ह्या वॉरंट विरोधात न्यायालयात धाव घेतली नसती तर अमिषा पटेल हिची अटक अटळ होती. रांची येथील अजय कुमार सिंग यांनी ह्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीमुळे जिल्हा न्यायालय रांचीच्यावतीने रांची पोलिसांनी मुंबई पोलिसांपर्यंत संपर्क साधला आणि अमिषा पटेल हिला हे वॉरंट जारी केले.
तक्रारदाराने काय सांगितले : अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायिक भागीदार कुणाल यांनी चित्रपट बनवण्यासाठी तक्रारदाराचे 250 कोटी रुपये घेतले होते. त्यांनी 2018 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पैसे परत करण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र ते तर आमिषाने पाळले नाहीच चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित देखील झाला नाही. त्याबाबत फसवणूक झाल्याचे तक्रादाराला लक्षात येऊ लागले. जेव्हा तक्रादरवतीने पैसे परत मिळावे ह्यासाठी अमिषा पटेलशी संपर्क साधला. तेव्हा तिने ३ कोटी रुपयांचा धनादेश दिलाहोता. मात्र जो धनादेश बँकेत वटला नाही. अर्थात तो बाऊन्स झाला, असे अजय सिंग यांनी सांगितले. ही घटना फसवणूक असल्याची बाब देखील तक्रादाराच्या वकिलांनी नमूद केली.
हेही वाचा:Sonu Nigam News: सेल्फी घेताना झालेल्या मारहाणीवर सोनु निगमने दिली 'ही' प्रतिक्रिया