महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Measles Vaccination : गोवर लसीकरणाच्या जनजागृतीसाठी आता सिने कलाकारांची मदत, पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती - पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

मुंबईमध्ये (Mumbai) गोवर बाबत जनजागृती (measles vaccination) करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने सिने अभिनेते सोनू सूद आणि रजा मुराद (Actors Sonu Sood and Raza Murad) यांची मदत घेतली आहे. या दोन्ही सिले कलावंतांच्या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती (help to raise awareness) केली जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Measles Vaccination
गोवर जनजागृतीसाठी आता सिने कलाकारांची मदत

By

Published : Jan 2, 2023, 7:39 PM IST

मुंबई :मुंबईमध्ये (Mumbai) ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा गोवरचा प्रसार सुरु झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिका गोवर लसीकरण (measles vaccination) मोहीम राबवत आहे. लसीकरण्यासाठी पालिकेने लोकप्रतिनिधी, धार्मिक गुरू, सामाजिक संस्था कार्यकर्ते यांची मदत घेतली आहे. त्यानंतर आता पालिकेच्या आरोग्य विभागाने सिने अभिनेते सोनू सूद आणि रजा मुराद यांचीही मदत (Actors Sonu Sood and Raza Murad) घेतली आहे. या दोन्ही सिले कलावंतांच्या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली (help to raise awareness) जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सोनू सूद, रजा मुराद यांचीही मदत :मुंबईमध्ये २०२० मध्ये गोवरचे २५ रुग्ण आढळून आले होते. २०२१ मध्ये ९ रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यु झाला होता. २०२२ मध्ये ५४२ रुग्णांची नोंद झाली, तर १८ बालकांचा मृत्यू झाला आहे. २०२० आणि २१ च्या तुलनेत २०२२ मध्ये गोवर रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली. नागरिकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घेतले नसल्याने ही वाढ झाली. यासाठी आरोग्य विभागाने मुस्लिम तसेच इतर धर्मियांच्या धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, धार्मिक सामाजिक संस्था यांची मदत घेतली. त्यानंतर काही प्रमाणात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने गोवरचा प्रसार आटोक्यात आला आहे. लसीकरण आणखी तीव्र गतीने व्हावे, यासाठी आता सिने अभिनेता सोनू सूद आणि रजा मुराद यांची मदत घेण्यात आली आहे. लसीकरण करून घेण्याचे आवाहन करणारे त्यांचे व्हिडिओ पालिकेने आपल्या सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तसेच गोवर पसरलेल्या विभागात हे व्हिडीओ प्रसारित केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.



५४१२ संशयित रुग्ण :मुंबईत १ कोटी ८ लाख ५ हजार ४६३ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ५४१२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ५४२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३७ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ८५ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १७३ जनरल बेडपैकी ७४, १२९ ऑक्सीजन बेड पैकी ६, ३५ आयसीयु बेडपैकी ४ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी ४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.



तीन वेळा शून्य रुग्णांची नोंद :मुंबईत सप्टेंबर ऑक्टोबर पासून गोवर रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज निश्चित निदान झालेले तसेच ताप आणि पुरळ असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. गोवरचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आल्याने १३ डिसेंबर, १८ डिसेंबर आणि त्यानंतर आज ३१ डिसेंबर रोजी शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.



गोवरमुळे १८ मृत्यू :मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १८ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १५ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १५ मृत्यूपैकी ९ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ६ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल, त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.



मुलांचे लसीकरण :आतापर्यंत नियमित सत्रात २७ हजार ५७०, अतिरिक्त सत्रात ३१ हजार ६९१ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ६० हजार ७३९ मुलांपैकी ९५,७९१ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. ६ ते ९ महिन्यातील ५२९३ बालकांपैकी २३३३ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्र असलेल्या ठिकाणी ८४ मुलांना पहिला तर ३३ मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ब्रिज खालील ८४ मुलांना पहिला तर ३४ मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे.


या उपाययोजना :गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन 'अ' दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन 'अ' देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details