मुंबई- बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मुंबईतील शक्ती सागर या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सोनू सूदने याचिका दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने माझ्यावर केलेली कारवाई ही भेदभाव असून मी इमारतीत कोणताही बदल केला नसल्याचा दावा सोनूने बुधवारी (दि.13 जाने.) न्यायालयत केला आहे.
1992 साली बंधण्यात आले आहे इमारत
शक्ती सागर ही इमारत 1992 साली बांधण्यात आली असून ही सहा मजली इमारत मी 2018 मध्ये खरेदी केली आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा सोनू सूद याने बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये केला आहे.
मला दिलेली नोटीस ही अस्पष्ट
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली आहे. पालिकेकडून आलेल्या नोटीसीमध्ये एमआरटीपी कायद्याच्या कलम 53 नुसार अनधिकृत बांधकामाचा कोणताच दाखला देण्यात आलेला नाही, असा दावा सोनू सूद यांनी केला आहे.
न्यायालयाने माझी बाजू समजून न घेता दिला निर्णय - सोनू सूद