मुंबई- देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने जवळ पैसे नसल्याने अनेकांनी पायी, काहींनी सायकलवर तर काहींनी मिळेल त्या साधनाच्या मदतीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने पुढे येऊन अनेक मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. त्याच्या या कामाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फोन करुन अभिनंदन केले आहे.
विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात सुरक्षित पोहचविण्यासाठी सातत्यपूर्वक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत राज्यपाल यांनी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवटरुन देण्यात आली आहे.