मुंबई - 108 या रुग्णवाहिकेने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उत्तम सेवा दिली आहे. मात्र, या रुग्णवाहिकेच्या सेवेबद्दल शहरातील लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. पक्षाघात, ब्रेन स्ट्रोक झालेल्या रुग्णाला साडेचार तासांमध्ये उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतील. रुग्णवाहिकेच्या योजनेची मी स्वत: लोकांमध्ये जावून जागृती करणार असल्याचे मत अभिनेते श्रेयस तळपदे यांनी मांडले आहे.
'108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत मी स्वत: जनजागृती करणार' हेही वाचा -काँग्रेसचे राजघाटावर सोमवारी धरणे प्रदर्शन, सोनिया,राहुल गांधी राहणार उपस्थित
पक्षाघात, ब्रेन स्ट्रोक झाल्यास साडे चार तासामध्ये रुग्णाला उपचार मिळाल्यास तर त्याला पक्षाघातावर मात करता येते आणि याच कालावधीला 'गोल्डन अवर्स' समजला जातो. रुग्णाला या कालावधीत हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यास तो वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते. अशावेळी रुग्णाला वेळेत रुग्णालयामध्ये पोहोचविण्याची जबाबदारी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका राज्यभर कार्यरत आहे. या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांमध्ये पक्षाघाताच्या रुग्णावर वेळेत उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल, परळ आणि द रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई स्ट्रोक सोसायटीतर्फे ब्रेन सेव्हिंग प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते.
ज्या व्यक्ती 108 क्रमांकावर आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांसाठी संपर्क करतात अशावेळी प्रसंगावधान कसे राखावे, प्राथमिक उपचार, गोल्डन अवर तसेच काय काळजी घ्यावी याविषयीचे प्रशिक्षण तज्ञांमार्फत देण्यात आले. यावेळी अभिनेते श्रेयस तळपदे, मुंबई, महाराष्ट्र, ईएमएस राष्ट्रीय आरोग्य मिशनचे प्रकल्प संचालक दिलीप जाधव आणि जिल्हा राज्यपाल (रोटरी) रत्न हरजितसिंग तलवार उपस्थित होते. स्ट्रोक हे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. स्ट्रोकच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. स्ट्रोक हे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. गोल्डन अवर दरम्यान रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. रूग्णांना स्ट्रोक, आगीच्या दुर्घटना, रस्ते अपघात आणि हृदयविकाराच्या झटक्यात सामोरे जाण्यासाठी मदत म्हणून सुरू करण्यात आलेल्या या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा राज्यभर कार्यरत आहे.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत 937 आपत्कालीन रुग्णवाहिका कार्यरत आहेत. तसेच या माध्यमातून रुग्णसेवेकरिता 2600 बीएएमएस तसेच बीयुएमएस डॉक्टर्स काम करत आहेत. मुंबईमध्ये 112 रुग्णवाहिका कार्यरत असून यामध्ये काम करणा-या डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले जाते. अशावेळी माहिती मिळताच रुग्णापर्यंत पोहोचण्याकरिता 18 मिनीटे कालावधी लागत असून तेथून रुग्णाला हॉस्पीटलमध्ये दाखल करेपर्यंत 26 मिनिटांचा कालावधी लागतो. या प्रशिक्षण सत्राच्या माध्यमातून गोल्डन अवरमध्ये रुग्णाचा जीव कशाप्रकारे वाचविता येईल तसचे या कालावधीचा पुरेपूर वापर करत रुग्णाला आवश्यक उपचार देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ग्लोबल हॉस्पिटलचे न्यूरोलॉजी स्ट्रोक आणि न्यूरोक्रिटिकल केअरचे प्रादेशिक संचालक डॉ. शिरीष हस्तक यांनी सांगितले.
हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी भ्रमनिरास करणारी, सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन - रघुनाथ पाटील