महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेता संदीप नाहरने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ - अभिनेता संदीप नाहर आत्महत्या न्यूज

गेल्या वर्षभरात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांनी आत्महत्या केल्या. यामध्ये आता अभिनेता संदीप नाहरचा देखील समावेश झाला आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आत्महत्या केली.

Sandeep Nahar
संदीप नाहर

By

Published : Feb 16, 2021, 7:54 AM IST

मुंबई - अल्टबालाजीच्या 'कहने को हम सफर है, एम एस धोनी, केसरी, अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेता संदीप नाहरने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी संदीपने आपल्या फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट करून त्याला होत असलेल्या मानसिक वेदना सांगितल्या. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नी कांचन शर्मावर काही आरोप लावले आहेत.

मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ

वैवाहिक संबंध होते तणावाचे -

'आता जगण्याची इच्छा राहीली नाही. जीवनात अनेकदा सुख-दु:ख बघितले आहे मात्र, आता जे माझ्यासोबत होत आहे ते सहनशीलतेच्या पलीकडे आहे. मला माहिती आहे की, आत्महत्या करणे चुकीचे आहे. मलासुद्धा जगायचे होते मात्र, आता या जगण्यामध्ये आत्मसन्मान नाही. त्यामुळे जगण्याला काय अर्थ आहे. माझी पत्नी कांचन शर्माने मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझी पत्नी आक्रमक स्वभावाची असून माझा स्वभाव तसा नाही', असे संदीपने आपल्या फेसबुक व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई होईल

शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई -

या कलाकाराच्या निधनानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहेत त्यांनी पोलिसांना संदीपचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये मिळाला. पंचनामाकरून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल आणि संदीपचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details