महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

death threat to Salman Khan : सलमान खानला 30 एप्रिल रोजी जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात - सलमान खानला धमकी

सोमवारी मुंबई पोलिसांना सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला. कॉलरने स्वत:ची ओळख राजस्थानच्या जोधपूर येथील रोकी भाई म्हणून करुन दिली होती. त्याने 30 एप्रिल रोजी सलमान खानला जीवे मारणार असल्याचे सांगितले होते. धमकीचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. यामध्ये हा फोन मूळ राजस्थानमधील रहिवासी असलेल्या १६ वर्षाच्या मुलाने ठाणे जिव्ह्यातील शहापूर येथून केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

Salman Khan death threat
सलमान खान धमकी

By

Published : Apr 11, 2023, 11:30 AM IST

Updated : Apr 11, 2023, 12:47 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ई मेलद्वारे धमकीचे पत्र मिळाल्यानंतर काही दिवसांनी, मुंबई पोलिसांना सोमवारी राजस्थानमधील एका व्यक्तीचा फोन आला ज्याने या महिन्याच्या शेवटी सुपरस्टार सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

३० एप्रिल रोजी सलमानला मारण्याची धमकी - मुंबई पोलिसांना राजस्थानच्या जोधपूर येथील रोकी भाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका व्यक्तीचा फोन आला, ज्याने 30 एप्रिल रोजी अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. 'पोलीस नियंत्रण कक्षाला काल आलेल्या एका कॉलमध्ये, राजस्थानच्या जोधपूर येथील एका व्यक्तीने स्वत:ची रोकी भाई म्हणून ओळख सांगितली होती. त्याने 30 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पुढील तपास सुरू आहे,' असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील फोन क्रमांकावरुन मिळाली होती धमकी- पोलिसांनी शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील एका 16 वर्षीय मुलाला पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. सोमवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तांत्रिक मदतीने त्यांनी मुंबईपासून ७० किमी अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरला ज्या क्रमांकावरून कॉल केला त्या नंबरचा मागोवा घेतला.

धमकी देणारा १६ वर्षाचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात - पोलिसांचे एक पथक शहापूर येथे गेले जेथे त्यांना 16 वर्षीय मुलाने धमकीचा कॉल केल्याचे आढळले. मूळचा राजस्थान येथील या मुलाला ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला मुंबईतील आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. सलमान खाला धमकी देण्यामागे मुलाचा हेतू काय होता याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वीही सलमानला मिळाली होती धमकी - मार्चमध्ये खानला एका ई-मेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. अभिनेत्याच्या जवळच्या सहकाऱ्याला पाठवलेल्या ई-मेल धमकीमध्ये माफिया डॉन लॉरेन्स बिश्नोईच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला होता. ज्यामध्ये सलमान खानला मारणे हेच त्याचे आयुष्याचे उद्दिष्ट होते, असा दावा केला होता. सलमानला धमकीच्या मेलच्या प्रकरणातील आरोपी धाकड राम याला अटक करण्यासाठी वांद्रे पोलिसांनी कारवाई केली आणि राजस्थान पोलिसांशी संधान साधले होते. तापासानंतर त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. वांद्रे पश्चिम येथील सलमानच्या घराबाहेरही पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. दरम्यान, सलमानकडून आतापर्यंत त्याला हटवण्यासाठी लेटेस्ट अल्टिमेटमवर कोणताही शब्द आलेला नाही. सुपरस्टार सोमवारी मुंबईत त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या भव्य लॉन्चमध्ये गुंतला होता.

सलमानने सुरक्षा लक्षात घेऊन गाडी बदलली - धमकी येत असल्याने सावध झालेल्या सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्हीचा कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च झालेली नाही. मात्र, त्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गाडी खरेदी केली आहे. त्याने निसान पेट्रोल एसयूव्ही कार आयात करून सावधानतेचे पाऊल उचलले आहे. दक्षिण आशियाई बाजारपेठेमधील ही सर्वात लोकप्रिय आणि महागडी एसयूव्ही कार मानली जाते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बुलेटप्रूफ अतिशय प्रसिद्ध आहे.

हेही वाचा-Salman Khans advice to Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींमध्ये अडकली शहनाज गिल; सलमान खानने दिला 'मूव्ह ऑन' करण्याचा सल्ला

Last Updated : Apr 11, 2023, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details