मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे कोकणातील दशावतार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कलावंतांना आर्थिक मदत करण्याची आवाहन अभिनेता दिगंबर नाईक यांनी केली आहे.
कोकणातील दशावतारी कलावंतांना आर्थिक मदत करा, अभिनेता दिगंबर नाईक यांचे आवाहन - टाळेबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरु असल्याने कोकणातील दशावतार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहन अभिनेता दिगंबर नाईक यांनी केली आहे.
![कोकणातील दशावतारी कलावंतांना आर्थिक मदत करा, अभिनेता दिगंबर नाईक यांचे आवाहन Actor Digambar Naik](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7125296-thumbnail-3x2-mum.jpg)
टाळेबंदीमुळे दशावतारी कलावंत घरी बसलेत. या कलावंतांकडे उपजीविकेचे कोणतेच साधन नाही आहे. कोकणातील पारंपारिक जत्रा दशावतारी कलावंत तुटपुंज्या पैशात काम करत असतात. मार्च, एप्रिल आणि मे या काळात दशावतारी कलावंत या पारंपरिक जत्रेत जाऊन उपजीविकेसाठी पैसे कमवत असतात. पण, यंदा कोरोनाच्या संकटात त्यांचा आर्थिक उदरनिर्वाह बंद पडला आहे. त्यामुळे या दशावतरी कलावंतांना सामाजिक संघटनांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन अभिनेता दिगंबर नाईक यांनी केल आहे.
हेही वाचा -दगडी चाळीत पार पडला 'डॅडीं'च्या मुलीचा विवाह सोहळा!