महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बच्चन पिता-पुत्राला कोरोनाची लागण, अनेक जण करताहेत बरे होण्याची प्रार्थना

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या कुटुंबियांचे व त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मच्याऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 11, 2020, 11:02 PM IST

Updated : Jul 12, 2020, 3:21 AM IST

मुंबई - अभिनेता अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या कुटुंबियांची व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. याबाबत खुद्द बच्चन पिता-पुत्रांनी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन माहिती दिली.

अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची व घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी येणे बाकी असल्याचे ट्विटकरुन सांगितले होते. त्यानंतर तासाभरातच अभिषेक बच्चन यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती स्वतः अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.

माझ्याशी गेल्या 10 दिवसात कामानिमित्त संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन अमिताभ बच्चन यांनी केले असून लोकांनी घाबरुन जाऊ नये, शांत रहावे, असे आवाहन अभिषेक बच्चन यांनी केले आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांनी परिवार व घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कोरोनाची चाचणी करुन घेतली होती.

अमिताभ व अभिषेक बच्चन यांच्यावर सध्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून जया, ऐश्वर्या व आराध्या यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे.

दरम्यान, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही माहिती दिली. तसेच त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या

निर्माते बोनी कपूर, बॉलिवूड अभिनेते सोनू सूद, मलयालम अभिनेते ममूटी, तेलुगू अभिनेते महेश बाबू यांनी गेट वेल सून सर, असे ट्वीट करत प्रार्थना केली.

दिग्गजांनी ट्विट करत अमिताभ व अभिषेक बच्चन यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

अमिताभ बच्चन शूजित सरकार यांचा 'गुलाबो सिताबो' चित्रपट अमॅझॉन प्राइम व्हिडिओ वर प्रदर्शित झाला होता. आगामी काळात अमिताभ बच्चन यांचे चेहरे, झुंड आणि ब्रह्मास्त्र हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Last Updated : Jul 12, 2020, 3:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details