मुंबई -प्रसिद्ध अभिनेता आदित्य सिंहा राजपूतचा मुंबईतील अंधेरी येथील घरी मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी घरातील बाथरूममध्ये आदित्य मृतावस्थेत आढळला. आदित्यच्या मित्राला तो मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर मित्राने व इमारतीच्या चौकीदाराने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले.
अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या अंधेरी येथील घरात आढळून आला आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. याप्रकरणाता पुढीत तपास सुरू आहे - मुंबई पोलीस
ड्र्ग सेवनामुळे मृत्यू? - सोमवारी मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात आदित्य सिंह राजपूतचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आदित्यच्या मृत्यूने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. यासंदर्भातला पुढील तपास मुंबई पोली करत आहेत.
कोण आहे आदित्य सिंह राजपूत - आदित्य सिंह राजपूत एक अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर होता. 'स्प्लिट्सविला' या टीव्ही रिअॅलिटी शोमुळे तो लोकप्रिय झाला होता. आदित्यचा उद्योगक्षेत्रात चांगलाच लौकिक होता. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. आदित्यने 300 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय होता आणि अनेकदा जीवनातील प्रसंग किंवा अभिनयाशी संबंधित पोस्ट शेअर करत असे. आदित्यने 'पॉप कल्चर' नावाचा स्वतःचा ब्रँड देखील सुरू केला होता.
करियरला मॉडेलिंगपासून सुरुवात - आदित्य सिंह राजपूत हा सुरुवातीला मॉडेलिंग करत होता. त्यानंतर त्याने फिल्म क्षेत्रामध्ये करिअरला सुरुवात केली होती. आदित्यने अनेक सिरीयल तसेच चित्रपटांमध्येही काम केले आहे. आदित्य हा ‘क्रांतिवीर’, ‘मैने गांधी को नही मारा’ या चित्रपटांमधून नावारुपाला आला होता.
हेही वाचा -
- Vignesh Shivan : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये विघ्नेश शिवनसोबत झळकला 'स्पायडर मॅन'
- Suhana Khan Birthday : 'नेहमी आनंदीत राहा बाळा', म्हणत शाहरुखने लाडक्या लेकीला दिल्या शुभेच्छा
- Manoj Bajpayee on Sushant Singh : शुद्ध मनाच्या सुशांत सिंगला फिल्म इंडस्ट्रीतील हेराफेरी कळली नाही