मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनी आला असून पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्याचे निमंत्रण दिले आहे. आज सायंकाळी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण रामदास आठवले यांना प्राप्त झाले आहे.
रामदास आठवलेंनाही मंत्रीपद, कार्यकर्त्यांचा जलोष - Ramdas Athalay
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारमध्ये आठवले मंत्री होत आहेत. आठवले यांच्या नावावर पंतप्रधान कार्यालयातून शिक्कामोर्तब केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे.

रामदास आठवलेंनाही मंत्रीपद, कार्यकर्त्यांचा जलोष
रामदास आठवलेंनाही मंत्रीपद, कार्यकर्त्यांचा जलोष
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारमध्ये आठवले मंत्री होत आहेत. आठवले यांच्या नावावर पंतप्रधान कार्यालयातून शिक्कामोर्तब केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. वांद्र्यातील संविधान निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आणि बँजो वाजवून आनंद व्यक्त केला आहे.