महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होळीमध्ये रंगाचा बेरंग करणाऱ्यावर होणार कारवाई - मुंबई

होळी खेळताना एखाद्या व्यक्तीला त्याच्या ईच्छेविरूद्ध भिजवल्यास, त्यांच्यावर रंग उडवल्यास किंवा त्याच्यावर पाण्याचा फुगा मारल्यास संबंधित व्यक्तीच्या विरोधात मुंबई पोलीस कडक कारवाई करणार आहेत.

रंगाचा बेरंग करणाऱ्यावर होणार कारवाई

By

Published : Mar 19, 2019, 8:45 PM IST

मुंबई- होळी खेळताना एखाद्या व्यक्तीला त्याच्या ईच्छेविरूद्ध भिजवल्यास, त्यांच्यावर रंग उडवल्यास किंवा त्याच्यावर पाण्याचा फुगा मारल्यास संबंधित व्यक्तीच्या विरोधात मुंबई पोलीस कडक कारवाई करणार आहेत. त्याबरोबर अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबईतील सगळ्या पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.

रंगपंचमी दरम्यान रंगांची उधळण केली जाते. रस्त्यावरून चालणाऱ्या वाटसरूना आणि खास करून महिलांना भिजवले जाते. त्यांच्यावर फूगे मारले जातात. अनेक वेळा रंगपंचमी दरम्यान दुर्घटना होतात. धावत्या ट्रेनमध्ये फुग्याचा फटका लागून जखमी होण्याच्या घटना देखील घडत असतात. या सगळ्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांना सूचित केले आहे.

रंगपंचमीदरम्यान धार्मिक भावना दुखवण्याचे प्रकार देखील घडतात. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच नागरिकांना होळी खेळावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details