महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Brokers of Mail Express Tickets Arrested: पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांची कारवाई, एकूण १८३ ई-तिकिटे जप्त - ४७ तिकीट दलालीच्या प्रकरणी कारवाई

प्रवाशांना आमिषे दाखवून बेकायदेशीर रित्या कमिशन वसूल करणाऱ्या तिकीट दलालांविरोधात पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत पश्चिम रेल्वेच्या सहा विभागांत दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या या कारवाईत १८३ ई तिकिटे, आरक्षण तिकिटांचे ४७ प्रकार उघडकीस आले आहेत. या तिकिटांची रक्कम ५.९३ लाख इतकी आहे.

Action taken by RPF Police
४७ तिकीट दलालीच्या प्रकरणी कारवाई

By

Published : Feb 9, 2023, 10:13 AM IST

मुंबई:मुलांच्या शाळांच्या सुट्टीच्या दिवशी गावी जाणे, एखाद्या ठिकाणी प्रवास करणे यासाठी काही महिने आधीच मेल एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट बुकिंग करावे लागते. अशा तिकीट बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांचा समावेश असतो. दलाला आधीच तिकीट बुकिंग करत असल्याने सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाहीत. दलालांकडून तिकीट अधिक रक्कमेने प्रवाशांना विकत घ्यावी लागतात. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि आरपीएफ पोलीस सतत प्रयत्न करत आहेत. अशा दलालांवर धाडी टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.



आरपीएफची विशेष टीम:प्रवाशांना आमिष दाखवून बेकायदेशीर कमिशन वसूल करणाऱ्या तिकीट दलालांविरोधात पश्चिम रेल्वे विशेष मोहीम राबवत आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाकडून सहाही विभागांमध्ये दलालांवर कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आरपीएफने दलालांच्या विरोधात विशेष कारवाई सुरू करण्यासाठी डिटेक्टीव्ह विंग, सायबर सेल आणि आरपीएफ गुन्हे शाखेच्या विभागातील समर्पित कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार केली आहे. या टीमने केलेल्या कारवाईत ,जानेवारी २०२३ मध्ये सुमारे ५.९३ लाख रुपये किंमतीची बेकायदेशीर दलालीच्या ४७ प्रकरणांमध्ये, १८३ ई तिकीटे तसेच आरक्षण तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.



गुन्हा दाखल करण्यात आला: २०२२ मध्ये, पश्चिम रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने बेकायदेशीर कमिशनच्या ७४७ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे ३२.६४ कोटी रुपये वसूल केले. ई तिकिटांच्या ३४ प्रकरणांमध्ये तिकिटांची किंमत जप्त केली. २६ बेकायदेशीर सॉफ्टवेअर सापडले. मुंबई, भावनगर, रतलाम आणि अहमदाबाद सर्कलमध्ये एकाच दिवसात बेकायदा दलालीची ७ वेगवेगळी प्रकरणे उघडकीस आली. या ७ प्रकरणांमध्ये सुमारे २.३३ लाख रुपये १४३ रेल्वे आरक्षित ई तिकीटे अंदाजे ३.९१ लाख आहेत. अंदाजे १५ हजार रुपये किमतीची ३१४ ई तिकीटे वापरली. सातही संशयितांकडून अनेक मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त करण्यात आले. ज्यात बेकायदेशीर तिकिटे बुक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या किंमतीच्या १० प्रवास तसेच आरक्षण तिकिटांचा समावेश आहे. सर्व संशयितांविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



जनजागृती मोहीम:दलालांना अटक करण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरपीएफ विशेष मोहीम राबवते. पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने बेकायदेशीर दलालांद्वारे तिकीट खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी अनेक जागरुकता मोहिमाही राबवल्या आहेत. या मोहिमेचा उद्देश प्रवाशांना रेल्वे कायद्याच्या कलम 143 मधील कायदेशीर तरतुदींबद्दल आणि दलालांद्वारे तिकीट, ई तिकीट खरेदी करण्याच्या परिणामांबद्दल शिक्षित करणे हा देखील होता.

हेही वाचा:Mumbai Airport Threat Call मुंबई विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची धमकी तरुणाला अवघ्या काही तासांत अटक

ABOUT THE AUTHOR

...view details