मुंबई -परिवहन विभागाकडून राबवण्यात आलेल्या खासगी प्रवासी बस तपासणी मोहिमेत राज्यभरात दोषी आढळलेल्या 3 हजार 62 बस गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 213 बस प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्त केल्या आहेत. अवघ्या 12 तासांमध्ये 213 बस जप्त करण्यात आल्याने, खासगी प्रवासी वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
नियमांचा भंग करणार्यांवर कारवाई
राज्यभरातील खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची वाहतूक करताना अनेकवेळा नियमांचे उल्लंघन होते, ज्यामध्ये प्रवाशांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, जादा भाडे आकारने, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसने अशा अनेक कारणांमुळे आरटीओ कार्यालयाने बस तपासण्याची मोहीम होती घेतली आहे. दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ईटीव्ही भारतला दिली.