महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CSMT पूल दुर्घटनाप्रकरणी कारवाई; दोन अभियंते निलंबित, कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा

ए. आर. पाटील आणि एस. एफ. काकुळते असे निलंबित करण्यात आलेल्या अभियत्यांची नावे आहेत.

पुल दुर्घटना

By

Published : Mar 15, 2019, 8:10 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आज पालिकेकडून २ अभियत्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ए. आर. पाटील आणि एस. एफ. काकुळते असे निलंबित करण्यात आलेल्या अभियत्यांची नावे आहेत. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर मुख्य अभियंत्यांनी या पुलाविषयीचा अहवाल आज सादर केला. त्यात पुलावरील स्लॅब चांगल्या स्थितीत नसून, स्लॅबमधील सळ्या बाहेर आल्या होत्या. पुलावरील सिमेंट काँक्रीटवर भेगा पडल्या होत्या. पुलाच्या पायऱ्या अनेक ठिकाणी तुटल्या होत्या. त्यामुळेच पुलवावरील स्लॅब आणि रेलिंग दुरुस्त करण्याचा सल्ला अहवालात देण्यात आला होता.

आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान या पुलाचा लोखंडी सांगाडा पाडण्याचे काम सुरू आहे. पालिका कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस अधिकारी पूल पाडण्यासाठी घटनास्थळावर उपस्थित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details