महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अश्लील चाळे करणाऱ्या 8 बारबालांवर समाजसेवेची कारवाई - रेस्टॉरंट

मुंबईतील सायन परिसरातील डिस्कव्हरी रेस्टॉरंट व बारवर धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत ८ बारबालांसह, १३ ग्राहक, ४ वेटर, १ बार मॅनेजर असे एकूण २७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

डिस्कव्हरी बार

By

Published : May 20, 2019, 12:04 PM IST

मुंबई- पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून मंगळवारी (14 मे) पहाटे मुंबईतील सायन परिसरातील डिस्कव्हरी रेस्टॉरंट व बारवर धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत ८ बारबालांसह, १३ ग्राहक, ४ वेटर, १ बार मॅनेजर असे एकूण २७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. सायन परिसरात डिस्कव्हरी बारमध्ये बारबाला अश्लील चाळे करीत असून त्यांच्यावर पैसे उधळले जात असल्याची तक्रार समाजसेवा शाखेला मिळाली होती. कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या 8 बारबालांना चौकशीसाठी पुन्हा पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. या संदर्भात धारावी पोलीस ठाण्यात भा.दं.वी. 294, 114, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details